Ticker

6/Breaking/ticker-posts

लसीकरणावेळी अडथळा आणला तर..याद राखा..!

 *नगर तहसीलदार उमेश पाटील यांची गावपुढा-यांना कारवाईची  तंबी







 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर: जनतेने कोविड प्रतिबंधक लसीकरणावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. लसीकरण प्रक्रीयेत कुणी अडथळा आणला किंवा बेकायदेशीरपणे त्रास देण्याचे कृत्य केले तर अशा व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

 नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालय, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून उत्तम काम सुरु आहे. सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाचे काम सुरु आहे. अशा परिस्थितीत जेऊर येथील आरोग्य केंद्रात लसीकरणावरून त्रास दिला जात असल्याची तक्रार तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे दाखल झाल्यानंतर प्रशासनाकडून ही तंबी देण्यात आली आहे.

 मागील दीड वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा करोनाच्या लढाईत दिवसरात्र कष्ट घेत आहे. मागील सहा महिन्यांपासून लसीकरणाचे काम सुरु आहे. सध्या कोविशील्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लसींचे डोस दिले जात आहेत. लस देण्याबाबत गाव पुढा-यांच्या कुरबुरी सुरु आहेत. राजकीय नेत्यांकडून  वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांवर दबाव तसेच दमबाजी करणे, सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे असे प्रकार घडू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा मानसिक तणावाखाली काम करत आहे.

 मध्यंतरी नगर तालुक्यातील वैद्यकीय अधिका-यांनी थेट प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे लेखी तक्रार करून राजकीय नेत्यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा वैद्यकीय अधिकां-यांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने हा इशारा दिला आहे. संपुर्ण प्रशासन आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी उभे राहणार असून जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या