Ticker

6/Breaking/ticker-posts

डॉ शेळके प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याचे आरोग्यमंत्री टोपे यांचे आदेश

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी : तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गणेश शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी तहसीलदार कलेक्टर या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे. सुसाईड नोटप्रमाणे तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना दिले असल्याची माहिती मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी दिली आहे.

डॉक्टर शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता दहा दिवस उलटून गेले असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट प्रमाणे कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे डॉक्टर शेळके यांच्या कुटुंबियासह त्यांच्या नातेवाईकांकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर शेळके यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा महासंघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन ज्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टर शेळके यांनी आत्महत्या केली आहे त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच डॉक्टर शेळके यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखाची मदत करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ शासन सेवेत घेण्यात यावे अशी मागणी दहातोंडे यांनी आरोग्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

या प्रकरणाबाबत आठ दिवसात तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व कलेक्टर या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर मुंबई येथे मंत्रालयासमोर बहिरवाडी, डांगेवाडी, करंजी ग्रामस्थांसह जिल्ह्यातील मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढणार असल्याचे नियोजन या तिनही गावच्या ग्रामस्थांनी केल्याची माहिती समजली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या