Ticker

6/Breaking/ticker-posts

बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर गावठी कट्टा कब्जात बाळगणारा आरोपी मतीन शेख याला शहरातील बंगाल चौकी येथून जेरबंद करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांचेकडून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अनिल कटके  यांना गोपनिय माहीती मिळाली कि अहमदनगर शहरातील बंगाल चौकी ,  येथे एक इसम गावठी कट्टा बेकायदेशीररित्या कन्नात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने फिरत आहे . 

आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा . पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके  यानी पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे , सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद , पोहेका संदीप घोडके , पोना शंकर चौधरी , संदीप पवार , रविकिरण सोनटक्के , दिपक शिंदे , पोकॉ  योगेश सातपुते , कमलेश पाथरुट , मेघराज कोल्हे ,अर्जुन बडे  सर्व नेमणुक स्थानिक गुहे . शाखा अ.नगर अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्याना सदर ठिकाणी जावून कारवाई करा असा आदेश दिल्यानं पथकातील अधिकारी व अंमलदार दोन पंचासह बंगाल चौकी , अहमदनगर येथे जावून सापळा लावून मिळालेल्या बतमामधील इसमाचा शोध घेत असतांना बंगाल चौकी , रिक्षा स्टॉप जवळ बातमीमधील वर्णनाचा इसम उभा राहून आजूबाजूस संशईत नजरेने टेहाळणी करीत असल्याचे दिसले . 

पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री झालेने सदर इसमास घेराव घालून त्यास ताब्यात घेवून त्याला पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मतीन बशीर शेख वय ४२ रा . जुना बाजार , भिस्त गल्ली , अहमदनगर असे असलेचे सांगितले . त्याला त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत एक बनावट गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असे एकूण ३०,३०० / - रु कि . गावठी कट्टा व जिवंत काडतुस मिळून आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले . सदर बाबत कोतवाली पो . स्टेला गु.र.नं. ॥ ५०५/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई कोतवाली पो.स्टे . हे करीत आहेत . 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या