Ticker

6/Breaking/ticker-posts

नाशकात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे फलक हटवल्याने उडाला एकच गोंधळ



 लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नाशिकः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रिम प्रोजेक्ट' असलेली व करोनामुळे तब्बल सव्वा वर्ष लांबणीवर पडलेल्या बहुप्रतीक्षित सिटीबस आज नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या लोकपर्ण सोहळ्याआधीच शहरात गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या लावलेले भाजपाचे फलक महापालिकेने अचानक हटविल्याने भाजपा नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला. हे फलक त्वरित लावावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे शहरामध्ये फलक लावण्यात आले आहेत ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का? असा प्रश्न भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी उपस्थित केला. केवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो नसल्याने फलक हटविले असा आरोप बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सचिन कुलकर्णी यांनी केला.

यावेळी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्याशी या पदाधिकाऱ्यांनी फोन केला असता त्यांनी आयुक्तांना सांगा असे सांगून फोन कट केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापात भर पडली. फलक काढण्यावरून बराच वेळ गोंधळ सुरू होता अखेर पोलीसांना यात हस्तक्षेप करावा लागला.

सर्वपक्षीय आज एकाच व्यासपीठावर

भाजपकडून फडणवीस यांच्यासह माजी पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, राष्ट्रवादीकडून भुजबळ, काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती राहील. त्यामुळे एकाच मंचावर आज भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सर्वपक्षीय नेते येणार असल्याने जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या