छायावृत्त...
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : मनपाच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने आज सकाळी इंपिरियल चौकापासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी रस्त्यावरील अनेक टपरी ,हातगाडी यांचेवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे पथक लावाजम्यासह आले असताना अनेक टपरी चालकांची एकच तारांबळ उडाली. अचानक रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टपर्या आणि हातगाड्या तुरुतुरु पळू लागल्या. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे ,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे ,अतिक्रमणचे कल्याणकुमार बल्लाळ आदी अधिकारी देखरेख करताना. यावेळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.
( फोटो - राजू
खरपुडे ,नगर)
0 टिप्पण्या