Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रतिकिलो कांदा बियाणे खरेदीवर 100 रुपयांची सूट

साधना एजन्सीचा शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगरकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डमधील मे. साधना एजन्सीच्या वतीने कोविड वॅक्सिन घेतलेल्या शेतकर्‍यांना कांदा बियाणे खरेदीवर प्रतिकिलो 100 रुपये सूट दिली जात आहे.

जागतिक कोरोना महामारीच्या काळात मार्केट यार्डमधील मे. साधना एजन्सीच्या वतीने राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. सध्याच्या महागाईच्या काळात शेतकर्‍यांना काहीसा दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न मे. साधना एजन्सीने केला आहे.  कोरोना महामारीवर उपाय ठरलेली कोविड 19ची लस ज्या शेतकरी बांधवांनी घेतली आहे, त्यांच्यासाठी कांदा बियाणे खरेदीवर विशेष सूट दिली जाणार आहे. काही नियम व अटीनुसार शेतकर्‍यांना ही सूट दिली जात  आहे. 1 किलो कांदा बियाणे खरेदी केल्यास 100 रुपयांची सूट दिली जाईल, अशी माहिती मे. साधना एजन्सीचे संचालक अजय बोरा यांनी दिली


राज्यात व नगर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नामांकित मे. साधना एजन्सीचे संचालक अजय बोरा नेहमीच शेतकर्‍यांना खते, औषधे, बी-बियाणे या विषयी माहिती देऊन मार्गदर्शन करतात. सध्या खरिप हंगामात एजन्सीच्या वतीने शेतकर्‍यांना विविध नामांकित कंपन्यांचे कांदा वे भुईमूग बियाणे, रासायनिक सेंद्रिय औषधे, तसेच सेंद्रिय व रासायनिक खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कांदा खरेदीवर सूट योजनेचा शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बोरा यांनी केले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या