Ticker

6/Breaking/ticker-posts

बाजारात कांद्याचे दर वधारले; मात्र लसणाचे भाव घसरले..



 लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

 औरंगाबाद: खरीप हंगाम सुरू झाल्यापासून एकीकडे भाजीपाल्याची आ‌वक काहीशी मंदावल्याचे चित्र असतानाही लसणाचे भाव मात्र किलोमागे सुमारे २० रुपयांची कमी झाले आहेत. आठ दिवसांच्या तुलनेत कांद्याने भाव खाण्यास सुरुवात केली आहे. फ्लॉवर, गवारचे दर घसरले असून वांगे, शिमला मिरची कडाडली आहे.

जाधववाडी बाजार समिती आवारातील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज स्थानिक तसेच शेजारी जिल्हे आणि परपेठहून शेतीनियमित मालाची आवक होत असते. गेल्या काही दिवसापासून भाजीपाल्याची आवक काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी, काही भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

यात प्रामुख्याने सिमला मिरचीचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी वधारले आहे. सध्या ४० ते ४५ रुपये किलो दर झाले तर ४० रुपये किलोने मिळणारे वांग्याचे दर किलो मागे ६० ते ७० रुपये झाले आहेत, अशी माहिती भाजीपाला विक्रेते नरहरी येवलेकर यांनी दिली.

कांद्याचे भाव ५ रुपयांनी वधारले असून सध्या २५ ते ३० रुपये किलो असा दर आहे. तर दुसरीकडे ग्राहकांसाठी समाधानाची बाब म्हणजे लसणाचे भाव काहीसे कमी झाले आहेत. आठ दिवसांपूर्वी प्रति किलो ११० ते १२० रुपये दराने मिळणारा लसणाचे भाव सध्या ८० ते १०० रुपये झाले आहेत. गावरान लसणाचे भावही किलोमागे २० रुपयांनी कमी झाले असून सध्या १२० ते १६० रुपये प्रती किलो असा दर असल्याचे त्यांनी नमूद केले. फ्लॉवर, गवारही १० रुपयांनी स्वस्त झाली असून सध्या अनुक्रमे ४० व ५० रुपये प्रती किलो दर आहे.

यासह बटाटे १५ ते ३० रुपये प्रती किलो, पत्ताकोबीचे दर किलोमागे २५ ते ३० रुपये असून गाजर ४० रुपये, टोमॅटो १५ ते २० रुपये, भेंडी ४० रुपये, कारले ५० रुपये, काकडी २५ ते ३० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये, हिरवी मिरची ४० रुपये, लिंबू २० रुपये, अद्रक ३० ते ४० रुपये किलो तसेच दोडके ६० रुपये प्रती किलो असे दर आहेत. तर मेथी, कोथिंबिर, पालक तसेच शेपू आदी पालेभाज्याच्या एका जुडीचा दर ८ ते १० रुपये आहे.

चवळी, दिलपंसदची आवक

बाजारात चवळी, दिलपसंतची (ढेमसे) आवक सुरू झाली आहे. चवळी ५० रुपये तर, दिलपसंद ६० रुपये किलो असे भाव असल्याचे विक्रेते येवलेकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या