Ticker

6/Breaking/ticker-posts

तपासासाठी गेलेल्या पोलिसांवरच दीडशेच्या जमावाने केला हल्लालोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

पुणे : पुण्यात तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकावर सव्वाशे ते दीडशे जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा प्रकार वारज्यातील म्हाडा कॉलनीत घडला. जमावाने पोलिसांच्या बातमीदाराचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर पोलिसांना बेदम मारहाण केली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे.


याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे (वय ३३) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सव्वाशे ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत दगडे यांची गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात नेमणूक आहे. त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत, अभिजित खंडागळे याच्याकडे गावठी पिस्तुल असून, तो साथीदारासह जबरी चोरी करणार असल्याचे कळाले. याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन, फिर्यादी तपासासाठी म्हाडा कॉलनी येथे गेले.

त्यावेळी पोलिसांच्या बातमीदारावर बांबू, विटा, सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला. तर, फिर्यादी अनाई त्यांच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या