Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांनी सुधारीत भातशेतीकडे वळावे - कृषि अधिकारी सुधीर शिंदे

 


शेतकऱ्यांना माहीती देतांना ता.कृषी अधिकारी सुधीर शिंदे 

लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

साकत : शेतकऱ्यांनी सुधारीत भातशेती कडे वळावे कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळेल  इंद्रायणी भात लागवड माहिती देताना तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे म्हणाले

आज साकत  येथे अविनाश लहाने यांच्या शेतात  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कृषी प्रात्यक्षिके  इंद्रायणी भात लागवड एस. आर.टी. सुधारीत पद्धतीने भात लागवड कार्यक्रमच्या वेळी शिंदे बोलत होते. यावेळी  कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे अभिजित गदादे,  मंडल कृषी अधिकारी के.एम.हिरडे ,  कृषी पर्वेक्षक ए. यु. कदम , सुरेश वराट , कृषी सहाय्यक  प्रशांत जाधव , तंत्रज्ञान व्यावस्थापक  तुषार गोलेकर , गणेश वारे , उपस्थित होते

 इंद्रायणी भात लागवड  क्षेत्रावर प्रत्यक्ष पहाणी करून  एस.आर.टी. पद्धतीने लागवड कशी करावी  प्रत्यक्षीक करून दाखवले बीज प्रक्रिया कशी करावी खते कोणती वाफरावी याची माहीती दिली खुप वर्षी पुर्वी साकत परिसरात भात लागवड केली जात होती आता नष्ट झाली मात्र सुधारीत पध्दतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांन फायदेशीर आहे त्यामुळे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी साकत गावात  शेतकऱ्यांना एकत्र करून भात लागवड करून एक नवा प्रयोग करण्याचे ठरवले आहे शेतकऱ्यांनीही साथ दिली आहे .

भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीकरचना म्हणजे एस. आर. टी. होय. असे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे अभिजित गदादे म्हणाले

या कार्याक्रमाला अविनाश लहाने , जगन्नाथ मुरूमकर ' प्रविण वराट ' महादेव वराट , युवराज वराट ज्ञानेश्वर वराट    व  शेतकरी उपस्थित  होते .
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या