Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, ३-४ दिवस राज्यात धुवांधार पाऊस

 लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई : राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यापासून आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सूनचं वेळेत दाखल झाल्यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आणि दुकांनामध्ये पाणी शिरलं आहे. अशात आता मुंबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अधिक माहितीनुसार, मुंबईसह सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट यांसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात धुवांधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.


विदर्भातही अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि नागपूरमध्ये मुसळधार पाऊस असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर तर गरज नसल्याच घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान
, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनचा प्रवास रेंगाळला आहे. राज्यात कोकण, गोवा, विदर्भात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे; पण शहरी भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होते आहे. मध्य महाराष्ट्रात बुधवारी महाबळेश्वरमध्ये ४५ मिलिमीटर, कोल्हापूरमध्ये १८, साताऱ्यात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या