Ticker

6/Breaking/ticker-posts

गहाण खतावरील मुद्रांक शुल्कात सरकारने केली कपात

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 पुणे: राज्य सरकारने गहाणखतांची नोंदणी करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये कपात केली आहे. आता मालमत्तेच्या एकूण किमतीच्या ०.५ टक्के किंवा जास्तीत जास्त १५ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.

 राज्याच्या महसूल विभागाने याबाबत नुकतीच अधिसूचना काढली आहे. सदनिका खरेदी केल्यानंतर बँकेकडून कर्ज घेतले असल्यास गहाणखत नोंदवावे लागते. त्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सदनिकेच्या किमतीच्या एक टक्का किंवा जास्तीत जास्त ३० हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येत होते. आता गहाणखाताची नोंदणी करताना मालमत्तेच्या किमतीच्या ०.५ टक्के किंवा जास्तीत जास्त १५ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


हजार रुपये आकारण्याची मागणी

'या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आता जास्तीत जास्त १५ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, त्याऐवजी राज्य सरकारने गहाणखतासाठी सरसकट एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारणे आवश्यक आहे,' असे 'अवधूत लॉ फाउंडेशन'चे मार्गदर्शक अॅड. श्रीकांत जोशी यांनी सांगितले.


' सदनिका खरेदीचा करारनामा करताना नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास गहाणखत नोंदवावे लागते. गहाणखत नोंदवितानाही मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याने नागरिकांना भुर्दंड पडत होता. त्याऐवजी आता जास्तीत जास्त १५ हजार रुपये आकारले जाणार आहेत. मात्र, ही रक्कम जास्तीत जास्त एक हजार रुपये करण्याची मागणी आहे,' 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या