Ticker

6/Breaking/ticker-posts

SBI चा 44 कोटी ग्राहकांना अलर्ट ! आज शुक्रवारी बँकेची ऑनलाईन सेवा ‘या’ वेळेला राहणार बंद ‘कारण’

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्लीः गेल्या वर्षभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड खूप वेगानं वाढलाय. विशेषतः कोरोना काळात आता पैशांचे व्यवहार मोठ्या शहरांतून थेट दुसर्‍या गावात ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. पूर्वी जेथे यूपीआय पेमेंट केवळ मोठ्या दुकानांपुरते मर्यादित होते, ते आता लहान दुकानांमध्ये, चहाचे दुकान आणि पाणीपुरीवाल्यांपर्यंतही पोहोचलेय. जवळजवळ प्रत्येक बँकेचे ग्राहक युपीआय पेमेंट्चा वापर करतात. अशा परिस्थितीत ही सेवा बंद झाल्यास व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने दुरुस्तीसाठी काही काळ आपली सेवा बंद करण्याची घोषणा केलीय

 

काय आहे प्रकरण?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. बँकेचे म्हणणे आहे की, ग्राहकांना अधिकाधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 7 मे रोजी दुपारी 12: 15 वाजता आणि 8 मे रोजी सकाळी 1:45 वाजता बँकेच्या ऑनलाईन सेवेत दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी बंद राहणार आहे. बँकेने म्हटले आहे की, यावेळी एसबीआय ग्राहकांना INB/YONO/YONO Lite/UPI सेवा वापरता येणार नाही.

SBI ने अलीकडेच आपल्या ग्राहकांना दिला मोठा दिलासा

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देखील आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे बर्‍याच राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत ग्राहक आता केवायसी (तुमचा ग्राहक जाणून घ्या) कागदपत्र (KYC Documents) पोस्टल किंवा ई-मेलद्वारे सादर करू शकतात. जेव्हा एसबीआयने पोस्ट वा मेलद्वारे केवायसीची कागदपत्रे स्वीकारण्यास सुरुवात केली, तेव्हा इतर बँकांच्या ग्राहकांनीही अशी व्यवस्था उपलब्ध करून दिलीय.

KYC  कधी आणि का केले जाते?

आता देशातील अन्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारेही केवायसी केले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर खासगी क्षेत्रातील बँका एका टप्प्यावर जातात आणि ग्राहकांना सुविधा देतात. म्हणून त्यांनी देखील तेच करावे, अशी अपेक्षा आहे. बँका त्यांच्या जोखमीवर आधारित ग्राहकांना रेट करतात. बँकेच्या उच्च जोखमीच्या ग्राहकांना प्रत्येक दोन वर्षांत किमान एकदा केवायसी अद्ययावत करावे लागते. तर इतरांना दर आठ वर्षांनी एकदा केवायसी अद्ययावत करावे लागेल. ज्या ग्राहकांचा धोका खूप कमी आहे, त्यांना दर दहा वर्षांनी एकदा केवायसी अद्ययावत करावे लागेल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या