Ticker

6/Breaking/ticker-posts

Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान, ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्लीः Reliance Jio कडे असे अनेक प्लान आहेत. ज्याची किंमत खूपच कमी आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जातो. जिओ फोन ग्राहकांसाठी कंपनीकडे ७५ रुपयांपासून प्लानची सुरूवात होते. जिओ फोन ग्राहकांसाठी कंपनीकडे ७४९ रुपयांचा प्लान सुद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ फोन ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या ७५ रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लान संबंधी खास माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.


७५ रुपयांचा जिओ फोन रिचार्ज प्लान
जिओ फोनचा ७५ रुपयांचा प्लान असून याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. ग्राहकांना रोज ०.१ जीबी डेटा दिला जातो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर या डेटाची स्पीड कमी होऊन 64Kbps होते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रत्येक नेटवर्कवर लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड मिळते. या प्लानमध्ये एकूण ५० एसएमएस ग्राहकांना फ्री मिळते. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ अॅप्स सारखे जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.


याशिवाय, जिओ फोन ग्राहकांसाठी कंपनी ७४९ रुपये, १८५ रुपये, १५५ रुपये, १२५ रुपयांचे प्लान सुद्धा आहेत. ७४९ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवस सर्व प्लानवर २८ दिवसांची वैधता मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या