Ticker

6/Breaking/ticker-posts

'स्पुटनिक'साठी रुग्णालये तयारीत; महिन्याभरात मिळणार 'इतक्या' लशी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई :  कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशींची उपलब्धता खासगी रुग्णालयांनी स्वतःहून करून घ्यायची आहे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच उत्पादक कंपन्यांनी मात्र २१ मेपर्यंत ही उपलब्धता होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता खासगी छोटी रुग्णालये तसेच नर्सिंग होम्सनी

स्पुटनिक लसीच्या उपलब्धतेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतातील या लसीच्या उत्पादक कंपन्यांशी रुग्णालयांच्या एकत्रित फोरमद्वारे चर्चा सुरू झाली असून मुंबईतील खासगी रुग्णालयांना १५ जूनपर्यंत दीड लाख लसींची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याची खात्रीदायक माहिती हाती आली आहे.

 यासंदर्भात खासगी रुग्णालये तसेच नर्सिंग होम्सनी केलेल्या स्वतंत्र नेटवर्कच्या वैद्यकीय सदस्यांनी सांगितले की, कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन २१ मेपर्यंत उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही मुंबईतील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये या लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे स्पुटनिकही उपलब्ध व्हावी, यासाठी एकत्रित मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये निर्धारित करण्यात आली आहे, त्यावर हे दर जाऊ नयेत यासाठी संबधित उत्पादक कंपनीशी चर्चा करणारे वैद्यकीय समिती सातत्याने प्रय़त्नशील आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य रुग्णालयांना लशींची उपलब्धतेमध्ये कोणत्या अडचणी येत आहेत, यासंदर्भात असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दोन दिवसानंतर कोव्हिशिल्ड तसे कोव्हॅक्सिनच्या संदर्भातील उपलब्धता स्पष्ट होईल. स्पुटनिक लसीसाठी नोंदणीसाठी कोणते वितरक आहेत याची स्पष्ट कल्पना नाही. मे महिन्याच्या मध्यावर लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू होईल. पण जागतिक निविदेला मिळालेला थंड प्रतिसाद, लशींचे धीम्या गतीने सुरू असलेले उत्पादन, केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना स्वतःहून व्यवस्था करण्याचे दिलेले निर्देश या सगळ्या घोळात वाट पाहण्याऐवजी रुग्णालयांकडे इतर पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शीतसाखळीची गरज

उत्पादक कंपनीसोबत या संदर्भातील दोन बैठका झाल्या असून त्यांनी संबधित रुग्णालयांना शीतसाखळी व्यवस्थापनाची तयारी करण्याचे सुचवले आहे. या लशीसाठी उणे वीस डिग्री तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तपेढ्या व रुग्णालयातील अंतर्गत व्यवस्थेमध्ये ही उपलब्धता ठेवावी लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या