Ticker

6/Breaking/ticker-posts

पुण्यात भारत बायोटेकच्या प्रकल्पासाठी जागा ठरली ; पुढील आदेशही जारी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 

पुणे: ‘भारत बायोटेक या कंपनीला करोना प्रतिबंधक लशींच्या उत्पादनासाठी प्रकल्प उभारण्यास देण्यात येणाऱ्या  मांजरी येथील सुमारे १२ हेक्टर जागेची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देश्मुख  यांनी बुधवारी पाहणी केली. त्यानंतर लगेचच जागेचा करार आणि हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना या जागेची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार देशमुख यांनी बुधवारी या ठिकाणी जाऊन जागेची पाहणी केली. सद्यस्थितीत करोना प्रतिबंधक लशींची आवश्यकता आहे. त्यामुळे भारत बायोटेककंपनीला या जागेवर तातडीने प्रकल्प सुरू करण्यासाठी जागेबाबतचा करार आणि हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मांजरी येथे वन विभागाची ही जमीन असून
, १९७३ मध्ये मर्क अॅ ण्ड कोया कंपनीअंतर्गत असलेल्या इंटरवेट इंडिया प्रा. लि.' (बायोवेट) या औषध निर्मिती कंपनीला ही जागा देण्यात आली होती. मात्र, ही कंपनी बंद पडल्यानंतर ही जागा मोकळी होती. या जागेवर प्रकल्प सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव भारत बायोटेक या कंपनीने राज्य सरकारकडे दिला होता. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने सद्यस्थितीत करोना प्रतिबंधक लशींची आवश्यकता असल्याने या कंपनीला ही जागा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार जागेची हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या