Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना :तालुका स्तरावर महसूल व आरोग्य विभागाचे संयुक्त पथकाची स्थापना करावी - रांधवणे

 कोरोना उपचार व संपूर्ण व्यवस्थेत सुसूत्रता यावी यासाठी संयुक्त  पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्याची गरजलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : कोरोना आजारामध्ये  उपचार घेऊन बरे झालेल्या तसेच औषधोपचार सुरु असतांना मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरमसाठ बिल दिले जात आहे. वाढीव बिलामुळे हॉस्पिटल प्रशासन व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अनेकदा वाद निर्माण होत आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाचा अनमोल वेळ वाया जात आहे, तर रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.  या सर्वच व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी तालुका स्तरावर महसूल, आरोग्य विभाग यांचे संयुक्त स्थापन करुन, त्यामार्फत नियंत्रण ठेवण्यात यावे,  अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे

      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यासाठी पुढील उपाययोजना आखण्यात याव्यात मागणी करण्यात आली आहे. रुग्णांची होणारी लूट व आपत्ती काळात सुसूत्रता आणण्यासाठी हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या बिलाची तपासणी करण्यासाठी तालुका स्तरावर महसूल, आरोग्य विभाग यांचे संयुक्त स्थापन करुन, पथकाकडून बिल तपासणी करण्यात यावी.  

हॉस्पिटलमधून रुग्णांना घरी सोडताना, एक दिवस अगोदर सदरचे बिल 'त्या' पथकाकडून तपासणी करण्यात येऊन, तहसीलचा शिक्का व स्वाक्षरी असलेले बिल रुग्णांना देण्यात यावे. तेच बिल रुग्णांकडून आकारण्यात यावे.

सदर बिल रुग्णांना देतांना त्या बिलामध्ये 'त्या' रुग्णाला देण्यात आलेल्या उपचाराची सर्व माहिती नमूद करणे बंधनकारक करण्यात यावे. त्यामध्ये रुग्ण भरती झालेली तारिख, त्याला देण्यात आलेल्या औषधांची माहिती, तारिख निहाय रुग्णाची ऑक्सिजन पातळी, ताप, बीपी, रेमडेसिवीर इंजेक्शन, रोज किती ऑक्सिजन देण्यात आला आदी गोष्टींचा उल्लेख असणे बंधनकारक करावे.या गोष्टीमुळे रुग्णांची लूट थांबवता येईल व रुग्णाला घरी सोडताना तसेच मृत पावल्यानंतर सदर रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतांना बिलामुळे उपस्थित होणारे वाद टाळणे शक्य होणार आहे.

 याच बरोबर रुग्णाला दिल्या जाणाऱ्या उपचारामध्ये अधिक पारदर्शकता येऊन हॉस्पिटल प्रशासन, नातेवाईक यांच्यात समन्वय तयार होईल. या प्रमुख मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाअधिका-यांकडे करण्यात आल्या असुन या मागण्यांचा विचार होऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या