Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावात मोकाट ,विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; साडेआठ लाखाचा दंड वसूल

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव :-  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने' ब्रेक द चेन ' या उपक्रमातंर्गत लागू केलेल्या निर्बंधाचे पालन न करणारे नागरिक तसेच वाहन चालकांकडून शेवगाव पोलिसांनी दिं. ३० एप्रिल अखेर ८ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे शासनाने ' ब्रेक द चेन ' या उपक्रमातंर्गत सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत.जिल्हाधिकारी डाँ. राजेंद्र भोसले यांनी  विनामास्क तसेच विनाकारण दुचाकीवर फिरणा-या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शेवगाव शहरात ३४५० नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. दिं.३० एप्रिल अखेर क्रांती चौक, आंबेडकर चौक, नित्यसेवा हॉस्पिटल चौक तसेच इतर वर्दळीच्या ठिकाणी मास्क न लावणा-या १०१६ नागरीकांवर व विनाकारण दुचाकीवर फिरणा-या २४३४ नागरीकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ८ लाख ४४ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला. 

         उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे व विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे तसेच पोलीस कर्मचारी सर्वश्री किशोर शिरसाठ, संदीप दरवडे, बप्पासाहेब धाकतोडे, बाळासाहेब नागरगोजे, रामेश्वर घुगे, भाऊसाहेब खेडकर, राजेंद्र ढाकणे, अशोक भोसले, अल्ताफ शेख आदींनी ही मोहीम राबविल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या