Ticker

6/Breaking/ticker-posts

'आजही तिला विसरू शकलेलो नाही' मनिषा कोईरालाच्या आठवणीत भावुक झाले नाना पाटेकर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: अभिनेता नाना पाटेकर बॉलिवूडच्या अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ९० च्या दशकात नाना पाटेकर यांनी एक पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्या काळात त्यांचं खासगी आयुष्य, विशेष करून त्यांचं आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांचं अफेअर सर्वाधिक गाजलं. कशी झाली यांच्या नात्याची सुरुवात, दोघांमध्ये अभिनेत्री आयेशा जुल्काची एंट्री कशी झाली आणि मग वाद होऊन मनिषा आणि नाना वेगळे झाले. पण या ब्रेकअपनंतरही नाना मनिषाला विसरू शकले नव्हते. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला होता.


नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांची पहिली भेट १९९६ मध्ये चित्रपट 'अग्निसाक्षी'च्या सेटवर झाली होती. त्यावेळी मनिषाचं अभिनेता विवेक मुक्षानशी ब्रेकअप झालं होतं. मनिषाला नाना पाटेकर यांचं व्यक्तीमत्त्व भावलं होतं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यांनी गुपचूप एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

' अग्निसाक्षी'नंतर नाना आणि मनिषा यांनी 'खामोशी' या चित्रपटात एकत्र काम केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटानंतर या दोघांच्या नात्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये जोरदार होऊ लागल्या होत्या. मनिषाच्या काही शेजाऱ्यांनीही नाना यांना मनिषाच्या घरातून सकाळी बाहेर पडताना पाहिल्याचं म्हटलं होतं. यावर एका मुलाखतीत नाना म्हणाले होते, 'मनिषा नेहमीच माझ्या आईला आणि मुलाला भेटायला येत असे आणि माझं कुटुंबीयही तिचं नेहमीच प्रेमानं स्वागत करायचे.'


नाना आणि मनिषा दोघंही तापट स्वभावाचे असल्यानं त्या दोघांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडणं होत असत. त्यावेळी नाना आपल्या पत्नीपासून वेगळे राहत होते. पण मनिषाशी लग्न करण्यास ते तयार होत नव्हते. त्यावेळी अशाही अफवा होत्या की, नाना पाटेकर आणि अभिनेत्री आयशा जुल्का यांच्यात या काळात जवळीक वाढली होती. रिपोर्टनुसार मनिषानं नाना आणि आयशा यांना एका खोली एकत्र पाहिलं होतं. ज्यानंतर मनिषा आणि नाना यांची भांडणं झाली. एवढंच नाही तर तिनं आयशालाही सुनावलं होतं. पण नानांवर याचा काहीच परिणाम झाला नाही.

या घटनेनंतर नाना आणि मनिषा कोईराला यांचं नातं संपलं. मनिषा आपल्या लाइफमध्ये पुढे निघून गेली. पण नाना मात्र मनिषाला विसरू शकले नाहीत. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, 'मनिषा सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती एक कस्तुरी मृगाप्रमाणे आहे. तिला समजायला हवं की, तिला कोणाच्या बंधनात राहण्याची किंवा कोणासाठी तडजोड करण्याची गरज नाही. तिच्याकडे सर्वकाही आहे आणि ते गरजेपेक्षा जास्तच आहे.'

नाना म्हणाले होते
, 'ती सध्या स्वतःसोबत जे वागत आहे. ते पाहून मी कसेबसे माझे अश्रू थांबवतो. मला यावर तिला काहीच बोलायच नाही. ब्रेकअप हा आयुष्यातला सर्वात कठीण काळ असतो. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या अनुभवातून जावं लागतं. मी कोणत्या दुःखातून जात आहे. हे मी शब्दात नाही सांगू शकत. मला मनिषाची आजही खूप आठवण येते.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या