Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमध्ये ७ दिवस कडक लॉकडाऊन; भाजी खरेदीसाठी झुंबड , सर्वच नियमांचा उडाला फज्जा

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर:- नगरमध्ये ७ दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात फक्त औषधाची दुकाने आणि सकाळी ७ ते ११ वेळेत दूध विक्री सुरू राहणार आहे, किराणा आणि भाजीपाल्यासह अन्य दुकाने बंद राहणार आहेत.

 हा निर्णय लागू होण्यापूर्वी रविवारचा एकच दिवस मिळाल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले.

 त्यामुळे भाजी बाजारात तोबा गर्दी झाली होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली होती. नव्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे सर्वच नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळालं.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या