Ticker

6/Breaking/ticker-posts

BSNL कडून जबरदस्त ब्रॉडबँड प्लान्स, 300Mbps ची सुपरफास्ट इंटरनेट स्पीड, 4TB पर्यंत डेटा

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः करोना व्हायरस आणि वर्क फ्रॉम होम (Work From Home) सध्या सुरू आहे. यामुळे सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.  BSNL  ने इंटरनेट ब्रॉडबँड प्लान्स लाँच केले आहेत. या  प्लानची सुरुवात ४५० रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या डिटेल्स.

Bharat Fibre प्लान्स सुरुच राहतील
ग्राहकांकडून  ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी होत असल्याने कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये आपले खास Bharat Fibre प्लान्स लाँच केले होते. हे प्लान बंद करण्यात येतील असे बोलले जात होते. परंतु, BSNL ने Bharat  Fibre प्लान्सला पुन्हा एकदा लाँच केले आहे.

Bharat Fibre  449  रुपयांचा प्लान
BSNL च्या Bharat Fibre ब्रॉडबँडचा सर्वात स्वस्त प्लान ४४९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 30Mbps च्या स्पीडने जवळपास ३.३ टीबी पर्यंत डेटा देत आहे. यासोबत लँडलाइन फोन कनेक्शन सुद्धा दिले जाते. प्लान अंतर्गत कोणत्याही नेटवर्कमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते.

Bharat Fibre  799 रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा हा प्लान दुसरा प्लान आहे. फास्ट इंटरनेटसाठी याला कंपनीने बाजारात लाँच केले आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 100Mbps ची स्पीड मिळते. या प्लानमध्ये एकूण ३.३ टीबी डेटा दिला जातो. तसेच ग्राहकांना यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.


Bharat  Fibre 999 रुपयांचा प्लान
कंपनीने फास्ट इंटरनेट हवे असणाऱ्या युजर्संसाठी हा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये युजर्संना 200Mbps ची स्पीड दिली जाते. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ३.३ टीबी पर्यंत डेटा दिला जात आहे. प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग शिवाय Disney+ Hotstar ची फ्री मेंबरशिप दिली जाते.

Bharat  Fibre 1,499 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये युजर्संना 300Mbps ची स्पीड मिळते. सोबत या प्लानमध्ये एकूण ४ टीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये BSNL यूजर्स ला Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या