Ticker

6/Breaking/ticker-posts

उन्हात अधिक वेळ राहिल्यास करोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी ? संशोधनात दावा

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

लंडन: अधिक वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास, विशेषत: अल्ट्राव्हायलेट किरणांच्या संपर्कात आल्यास संबंध करोनामुळे होणारा मृत्यू टाळला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे. सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिल्यास सामान्य नागरिकांच्या आरोग्यात मदत मिळू शकते.

'ब्रिटीश जर्नल ऑफ डर्मटॉलजी'मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अमेरिका खंडात जानेवारी ते एप्रिल २०२० झालेल्या मृत्यूंपैकी २४७४ काउंटीमधील अल्ट्राव्हायलेटच्या स्तराची तुलना केली गेली. अल्ट्राव्हॉलट किरणांच्या उच्च स्तरीय भागात करोनाच्या संसर्गामुळे कमी प्रमाणात मृत्यू झाले आहेत.

संशोधकांनुसार, इंग्लंड आणि ब्रिटनमध्ये देखील अशाच प्रकारचे संशोधन करण्यात आले. संशोधकांनी वय, समुदाय, सामाजिक-आर्थिक स्थिती, लोकसंख्येचे घनत्व, वायू प्रदूषण, तापमान आणि स्थानिक भागातील संसर्गाचा स्तर आदी बाबी लक्षात घेऊन करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण केले. संशोधकांनी सांगितले की, सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिल्यामुळे त्वचा नायट्रिक ऑक्साइडला बाहेर काढते. त्यामुळे कदाचित विषाणूचा प्रभाव कमी होतो.

दरम्यान, संपूर्ण जगात करोनाचे थैमान सुरू असताना काही मोजक्याच देशांना करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. तर काही देशांनी करोनाचा संसर्गच दाखल झाला नसल्याचे म्हटले आहे. करोनाबाधित चीन आणि दक्षिण कोरियाची सीमा लागून असलेला उत्तर कोरिया करोनामुक्त आहे. उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला ही माहिती दिली आहे.




करोंना  महासाथीचा आजार सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियाने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. करोनापासून बचाव करण्यासाठी उत्तर कोरियाने आपल्या सीमा बंद केल्या आहेत. करोनाची लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले. या घडामोडीनंतरदेखील देश करोंना मुक्त असून एकही बाधित आढळला नसल्याचे उत्तर कोरियाने म्हटले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या