Ticker

6/Breaking/ticker-posts

खासदार प्रितम मुंडे पीपीई किट घालून थेट कोव्हिड वॉर्डात

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

बीड : बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी पीपीई किट घालून बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

 

बीडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये. तसेच त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रितम मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट परिधान केला होता. यानंतर त्यांनी या रुग्णालयातील आरोग्य सुविधांची माहिती घेतली. तसेच कोव्हिड रुग्णांची संवादही साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या