Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांचा अंत्यविधी स्थानिक पातळीवर करावा : आमदार संग्राम जगताप

 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांचा अंत्यविधी अहमदनगर शहरातील अमरधाममध्ये न करता स्थानिक पातळीवर करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आ. जगताप यांन पत्रात म्हटले आहे, की अहमदनगर शहरात व तालुका स्थरावर कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे बाधित रूग्णांच्या मृत्यूूचे प्रमाण सद्य स्थितीत वाढलेले आहे.

जिल्ह्यात कोठेही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला तर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अहमदनगर शहरातील स्मशानभुमित आणले जाते. त्याठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. स्मशानभुमी लगतचा परिसर हा शहरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात.

तसेच या ठिकाणी अंत्यविधी केल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील अनेक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांचा अंत्यविधी त्यांच्या स्थानिक स्थळावर करण्याबाबत मागणी केली आहे. तसेच अहमदनगर शहरातील स्मशानभुमीतील वर्दळ कमी होईल आणि अहमदनगर शहरातील जे काही बाधित रूग्ण या आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांचे अंत्यविधी लवकरात लवकर होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या