Ticker

6/Breaking/ticker-posts

“राज्यात कोविडचा कहर, मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करणारा विरोधी पक्ष काय उपाययोजना देणार?”

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे, पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे. हे तर नवेच महाभारत सुरू झाले! असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात याबाबत टीका करण्यात आली आहे.

कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे, पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान म्हणाले. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे. आता भीती कोरोनाची नसून लॉकडाऊनची आहे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.

टाळेबंदीनको हे मान्य, पण कोरोनाला कसे थोपवायचे?

संपूर्ण देशात पुन्हा एकदा आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता भीती कोरोनाया विषाणूची नसून लॉक डाऊनया सैतानाची आहे. काही झाले तरी पुन्हा लॉक डाऊननको अशी लोकांची मानसिकता स्पष्ट दिसत आहे. या सगळय़ाचा संबंध शेवटी नोकरी, रोजगार व आर्थिक उलाढालीशी येतो. लॉक डाऊनचा मार्ग पुन्हा स्वीकारला तर आताच उभा राहू लागलेला उद्योग-व्यापार पुन्हा कोसळून पडेल. कोरोना कुणालाच सोडत नाही. तो भेदभाव करत नाही. तो जात, धर्माची अस्पृश्यता पाळत नाही.

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना एकदा सोडून दोनदा कोरोना झाला. आदित्य ठाकरे हे कोरोनाने संक्रमित झाले. सौ. रश्मी ठाकरे यांना कोरोनामुळे इस्पितळात दाखल व्हावे लागले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाने ग्रासले. महाराष्ट्रात साधारण पंचवीस हजार लोक रोज कोरोनाग्रस्त होत आहेत. मुंबईत हा आकडा पाच हजारांवर आहे. लोकांना टाळेबंदीनको हे मान्य, पण कोरोनाला कसे थोपवायचे? स्वतःवर निर्बंध घालून शिस्त पाळायला कोणीच तयार नाही, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार?

मुंबईसारख्या शहरातले कोविड सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. श्रीमंतांच्या खासगी रुग्णालयांतही जागा नाही. असे अभूतपूर्व संकट आज महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात कोविडचा कहर आहे, पण महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्दैव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, ‘हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा.तेव्हा त्यांच्यावर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार? असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.

विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी आणि राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही. राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे, असे विरोधी पक्षाने पुढे येऊन सांगायला हवे होते. त्यात सगळय़ांचेच हित झाले असते, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या