Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासार आरोग्य केद्रांला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयचा दर्जा देउन येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी नर्स व इतर स्टाफ पदे भरण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन ऊसतोड मजुर कामगार आघाडी चे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा दादासाहेब खेडकर  व   ग्रामपंचायत सदस्य मिथुन डोंगरे यांनी महसूल मंञी बाळासाहेब थोरात ,आमदार मोनिका राजळे यांच्याकडे केली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्र येतात पुर्व भागातील पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या या परीसरात ऊसतोड मजुर असल्याने येथील आजाराने ग्रस्त असलेल्या रुगणांना उपचारासाठी वनवन फिरावे लागते महीलांना प्रसुतीसाठी अॅम्बुलस नसल्याने अडचणी येतात अपघाती रुगणांना तातडीने उपचार मिळत नाहीत अशा परिस्थितीत येथील रुगणांना अहमदनगर किंवा बीड जिल्ह्यात उपचारासाठी जावे लागते .

यामुळे खरवंडी कासार परीसरातील रुगणांना कायमस्वरूपी वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी   ग्रामीण रुग्णालय उभारुन रुग्णांच्या सेवेसाठी  दोन ॲम्बुलंस अत्याधुनिक वैद्यकीय सुविधां आॅक्सीजन बेड काॅलरा टायफाईड रेबीज कावीळ या साथीच्या आजाराच्या लस वैद्यकीय यंञे उपकरणे उपलब्ध करुन देण्यात यावीत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या