Ticker

6/Breaking/ticker-posts

१८ वर्षावरील व्यक्तींना लससाठी रजिस्ट्रेशन सुरू, 'हे' डॉक्यूमेंट्स आवश्यक

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः देशातील १८ वर्षावरील व्यक्तींना करोना लससाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर १ मे २०२१ पासून लस साठी पात्र ठरणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात लस प्रोसेस मध्ये रजिनस्ट्रेशन करणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. हे बंधनकारक आहे. जर तुमचे वय १८ वर्षापेक्षा जासत असेल तर तुम्ही CoWIN पोर्टल किंवा Aarogya Setu अॅपवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

CoWIN पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशनसाठी या स्टेप्स फॉलो करा

१. सर्वात आधी https://selfregistration.cowin.gov.in/ वर जा. आपला मोबाइल नंबर टाका. त्यानंतर Get OTP वर क्लिक करा. ओटीपी मिळाल्यानंतर त्याला एन्टर करा. नंतर ‘Verify’ वर क्लिक करा.
२. यानंतर ‘Register for Vaccination’ पेजवर आपला फोटो आयडी प्रूफ, नाव, जेंडर आणि जन्मतारीख सोबत सर्व माहिती भरा.
३. असे केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेट शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ‘Schedule’ बटनवर क्लिक करा.
४. यानंतर तुम्ही तुमचा पिनकोड टाका, सर्च वर क्लिक करा. या पिन कोड सोबत सेंटर दिसतील.

५. तुमच्या हिशोबाप्रमाणे सेंटर, डेट आणि टाइमची निवड करून ‘Confirm’वर क्लिक कर

Aarogya Setu  अॅपवरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा


१.
Aarogya Setu  अॅपला ओपन करा. होम स्क्रीनवर देण्यात आलेले कोविन टॅबवर क्लिक करा.

२. असे केल्यानंतर Vaccination Registration ला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला फोन नंबर एन्टर करा. त्यानंतर एक ओटीपी येईल. तो एन्टर करा.
३. त्यानंतर ‘Register for Vaccination’ ओपन होईल. तुम्ही सर्व माहिती एन्टर करा. फोटो आयडी प्रूप, नाव, जेंडर, जन्मतारीख सर्व एन्टर करून ‘Register’ वर क्लिक करा.
४. यानंतर अपॉइंटमेटला शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. या ठिकाणी ‘Schedule’ बटनवर क्लिक करा.
५. यानंतर एक एरियाचा पिन कोड टाका. अन् सर्च वर क्लिक करा. उपलब्ध सेंटर दिसतील. त्यात टाइमला सिलेक्ट करून Confirm वर क्लिक करा. तुमचे अपॉइंटमेंट बुक होईल.


रजिस्ट्रेशनसाठी या डॉक्यूमेंट्सचा वापर करू शकता
रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायविंग लायसन्स, (MGNREGA) जॉब कार्ड, MPs/MLAs/MLCs कडून देण्यात आलेले ओळखपत्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्ड, पासपोर्ट, पेंशन दस्तावेज़, बँक / पोस्ट ऑफिस कडून देण्यात आलेले पासबुक आणि केंद्रीय / राज्य सरकार / सार्वजनिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राचा वापर करू शकता.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या