Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर ब्रेकिंग ! आणिबाणी, ऑक्सिजनच्या टँकरची अशी ही पळवापळवी ..!

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर : -   राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर दररोराजाचे आकडेवारी नवनवीन विक्रम करत आहे. या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे वैद्यकीय सेवांवर ताण पडत आहे. परंतु आता ऑक्सिजनचा पुरवठाही कमी पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरची पळवापळवी सुरू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला असून प्रशासनाने यात लक्ष घालून पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून समान वाटप केले नाही, तर खासगी कोरोना रुग्णालये बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे.


नगरचा जर विचार केला तर खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्ण सर्वाधिक ऍडमिट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गरज भासतेच. परंतु सध्या तो उपलब्ध करण्यासाठी डॉक्टरांची धावपळ सुरू आहे. यासाठी पुरवठादाराकडे पाठपुरावा केला जातो. प्रसंगी महागड्या दराने खरेदी करावी लागते. अशावेळी पोलिस बळाचा वापर करून ऑक्सिजनची पळवापळवी केली जात असल्यास आम्ही आमची सेवा बंद करून रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून देऊ, असा इशाराच खासगी व्यावसायिकांनी दिला आहे. प्रशासनाला सरकारी रुग्णालयातील रुग्णांची जशी काळजी आहे, तशी खासगी रुग्णालयांतील रुग्णांची नाही काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.


गुरूवारी ऑक्सिजनचा एक टँकर (सुमारे ९ टन) पोलिस बंदोबस्तात नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत होता. याच दरम्यान, नगरमधील खासगी रुग्णालयांनीही त्यांची मागणी केलेली होती. परंतु हा ऑक्सिजनचा टँकर आपल्याकडे न येता जिल्हा रुग्णालयात निघाल्याचे पाहून खासगी रुग्णालयाचे डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आले. ऑक्सिजन नाही मिळाला तर आमच्या रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू होईल, असे सांगत डॉक्टरांनी तेथेच आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे अर्धा ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयात आणि अर्धा खासगी रुग्णालयांना असा तोडगा यावेळी काढण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या