Ticker

6/Breaking/ticker-posts

सीना धरणातून सोड्ले पहिले उन्हाळी आवर्तन..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मिरजगाव :- तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीत ठरल्याप्रमाणे हे आवर्तन सोडण्यात आले. एकूण पंचवीस दिवसांचा आवर्तन कालावधी असून टेल टू हेड होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी  तथा कालवा सल्लागार समितीचे  सचिव बाजीराव थोरात यांनी दिली आहे.या वेळी शाखा अभियंता प्रवीण भांगरे उपस्थित होते.ऐन उन्हाळ्यात उभ्या पीक व फळबागांना या मुळे जीवदान मिळण्या बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

 

कोरोना च्या पार्श्वभूमीवर  23 तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली होती.या बैठकीस कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार,आष्टी चे आमदार बाळासाहेब आजबे,आमदार बबनराव पाचपुते,प्रांताधिकारी अर्चना नाष्टे,अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे,सचिव तथा उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात आदी सहभागी झाले होते.या ऑनलाइन बैठकीत एक एप्रिल रोजी सीना धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पहिले  उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निश्चित झाले.त्या नुसार  सदर आवर्तन सोडण्यात आले आहे.सीना धरणाची 2400 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून सध्या 1311 दशलक्ष घनफुट पाणी साठा उपलब्ध आहे.एका आवर्तनासाठी 284 दशलक्ष घनफुट पाणी लागत असून दोन उन्हाळी आवर्तन पिकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत.या आवर्तनात एकूण 1600 हेकटर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.सीना कालव्याचे नूतनीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळला आहे.


सध्या उन्हाची काहिली वाढल्या मुळे विहिरी आणि कूपनलिका यांनी तळ गाठला होता तसेच पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्ह होती या मुळे शेतकरी वर्ग धास्तावला होता मात्र सदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे तसेच संभाव्य टंचाई च्या भीतीने प्रशाकीय अधिकारी कर्मचारी यांचे  चिंताक्रांत चेहरे खुलले आहेत .एन उन्हाळ्यात सीना धरणाचे आवर्तन सुटल्यामुळे उन्हाळी पिकांची तहान भागणार आहे. एकंदरीत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या