Ticker

6/Breaking/ticker-posts

बोंबला ! दारू समजून मारला सॅनिटायझरचा 'एकच पेला' थेट 'उघडले स्वर्गाचे द्वार' ! ५ तळीरामांचा मृत्यू ..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

यवतमाळ : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वत्र मोठे थैमान घातले आहे. विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे प्रचंड वेगाने प्रसार होत असून, राज्य सरकारने संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझरचं प्राशन केले. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडली आहे. दारूचं व्यसन जडलेल्या काही तळीरामांनी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला. यात तिघांचा घरी मृत्यू झाला आहे. तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळे त्यांनी सॅनिटायझरच प्यायले, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. या घटनेतील इतर तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृतांची नावे आहेत.

राज्यात अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांतून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन आढळून आले आहे. त्यामुळे इथे प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर राज्यभरात विषाणूचं संक्रमण झालं. संसर्गाची साखळी तोंडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला. तर यात अनेक जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीवरही बंधनं घालण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या