Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासारमध्ये २ दिवसाचा जनता कर्फ्यू ..

 कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खरवंडी कासार बाजार पेठ दोन दिवस बंदचा निर्णय 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे  कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे उदया रवीवार व सोमवार रोजी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय खरवंडी कासार ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आला आहे .

खरवंडी कासार व परिसरात   रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गाव बंद ठेवण्याबाबत सदस्य मडंळ बैठकीत चर्चा झाली त्यानुसार  रवीवार व सोमवार  जनता कर्फ्यू लावण्यात येणार असून दोन  दिवस  गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती सरपंच प्रदीप पाटील  दिली आहे.

गावातही कोरोणाचे रुग्ण वाढत आहेत हा आकडा जवळपास विस  पर्यंत गेला असून खबरदारी म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रदीप पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली ग्रामपंचायतने दोन दिवस गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तसेच मगंळवारी बाजारपेठ चालु होईल कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून कोरोना बाबचे सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन सर्वानी करावे ग्राहक व विक्रेते यांनी मास्कचा वापर करावा विना मास्क व्यक्ती आढळुन आल्यास दोनशे रुपये दंड व ज्या दुकानात गर्दी व्होईल व कोरोनोचे नियम पाळले जाणार नाहीत ते दुकान आठ दिवसा साठी सिल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला .

यावेळी उपसरपंच  दिलीप पवळे ग्रामविकास अधीकारी अशोक दहीफळे ग्रामपंचायत सदस्य युसुफ बागवान मिथुन डोगरे योगेश अंदुरे बाबासाहेब ढाकणे दिपक ढाकणे भऊसाहेब सागंळे दौलत सोनवणे गणेश जगताप प्राथमिक .आरोग्य क्रेदांचे कर्मचारी राधाकिसन गाडे आनिल किर्तने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या