सभापती प्रशांत गायकवाड
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पारनेर :
राज्यात करोना विषाणूचा
प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाने त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यास
सुरूवात केलेली आहे. करोना पासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून पारनेर
तालुक्यातील नागरीकांना तात्काळ लसीकरणाची सोय व्हावी म्हणून पारनेर तालुका कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासनास एक लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे
सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
तालुका प्रशासन करोना प्रतिबंधासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. त्यास हातभार म्हणून लसीकरणासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान लसीकरणासाठी आवष्यक लसी उपलब्ध होणार असतील तर एखाद्या कोव्हीड केअर सेंटरलाही ही मदत देण्यात यावी अशी सुचनाही जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, सभापती प्रशांत गायकवाड यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी फोन वरून संपर्क करून बाजार समितीच्या नफ्यातून करण्यात येणाऱ्या मदतीस शासनाची परवाणगी देण्याची विनंती केली. मंत्री पाटील यांनी या प्रस्तावासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले.
.
0 टिप्पण्या