Ticker

6/Breaking/ticker-posts

विक्रमी ४ लाख टन ऊसाचे गाळप करून केदारेश्वर कारखान्याच्या हंगामाची सांगता ..

पुढील हंगामासाठी ५ लाख मे.टनाचे उदिष्ट-ढाकणे
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )टाकळी मानुर  (विक्रम केदार ) : - संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 सालच्या हंगामाची आज सकाळी 9-30 वा.यशस्वीपणे सांगता करण्यात आली.कारखान्याने यंदाच्या हंगामात ४ लाख सहा हजार १२४ मे.टन ऊसाचे गाळप केले.मागील पंधरा वषाँत पहिल्यांदाच इतक्या विक्रमी ऊसाचे गाळप करण्यातआले . पुढील हंगामासाठी कारखान्याने पाच लाख टनाचे उदिष्ट ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी केले.

बोधेगाव येथील संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 सालच्या गाळपाच्या हंगामाची सांगता आज दि.26 रोजी सकाळी करण्यात आली.कारखान्याचे उपाध्यक्ष डाॕ.प्रकाश घनवट,संचालक त्र्यंबकराव चेमटे,संदीप बोडखे,मोहनराव दहिफळे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.यावेळी प्र.कार्यकारी संचालक रमेश गर्जे,शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे,चीफ केमिस्ट अधिकारी के.डी.गर्जे,चीफ इंजिनिअर प्रविण काळूसे,केन सुपरवायझर किसन पोपळे,मुख्य लेखापाल तिथॕराज घुंगरड,प्रशासकीय अधीकारी पोपट केदार आदी उपस्थित होते.

अधिक माहीती देताना अध्यक्ष अॕड.ढाकणे म्हणाले,कारखान्याने यंदा चार लाखांहून अधिक ऊसाचे गाळप केले.यंदाचा हंगाम सर्व बाबतीत यशस्वी ठरला.यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ,अधिकारी-कमॕचारी,ऊस उत्पादक शेतकरी,सभासदांच्या विश्वासाच्या व मेहनतीच्या जोरावर गेल्या पंधरा वषाँत पहिल्यांदाच ही कामगिरी कारखान्याला बजावता आली.यंदाच्या हंगामातील कारखान्याने सवाँची देणी वेळेवर अदा केली असून राहीलेले ऊसाचे पेमेंट पुढील महिन्यात बँकेत वगॕ करण्यात येईल.

सेच कार्यक्षेत्रात पुढील हंगामासाठी ऊसाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असून कारखान्याने पुढील हंगामासाठी पाच लाख मे.टन ऊसाच्या गाळपाचे उदीष्ट ठेवले असून ते साध्य करण्यासाठी कारखाना प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.चालू हंगाम यशस्वी झाल्याबद्दल ढाकणे यांनी सवाँचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या