Ticker

6/Breaking/ticker-posts

न झालेल्या भेटीची इतकी चर्चा ? ; भाजपचे वेगळेच राजकारण

 



लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या भेटीचे खंडण केले आहे. मात्र, याची चर्चा घडविण्यामागे भाजपला काही तरी वेगळे राजकारण करायचे असून कार्यकर्त्यांनी सावध रहावे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत व जामखेड येथील सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यात आला असून तेथे खाटांची क्षमता वाढविण्यात आली आहे. या रुग्णलयांची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

त्यावेळी ते म्हणाले, 'दिल्लीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते सामाजिक प्रश्नावर एकमेकांना भेटत असतात. अशा भेटी नियमित होत असतात. ज्यामध्ये वेगळे असे काही नाही. परंतु भारतीय जनता पक्षाला यामधून वेगळे राजकारण करायचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे ज्या भेटीवरून हे वादळ उठले आहे ती भेट झालेलीच नाही. शहा आणि पवार यांचा भेट झालेली नाही, अशी माहिती यापूर्वीच आमच्या पक्षाचा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे मलाही वाटते की भेट झालेली नाही. मात्र, भाजपला वेगळे काही तरी राजकारण करायचे दिसून येते. मात्र कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे. या न झालेल्या भेटीची भाजपने वेगळी चर्चा या ठिकाणी करू नये,' असेही पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या