Ticker

6/Breaking/ticker-posts

केवळ 500 रुपयांसाठी केली , नगरच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची हत्या

 *परीक्षेसाठी औरंगाबादेत गेला होता ( पाथर्डी ) चा विकास

* हत्ये प्रकरणी एक जण पोलिसाच्या ताब्यातलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर : - समाज एकीकडे कोरोनाशी लढतो आहे आणि एकीकडे समाजात विध्वसंक वृत्ती देखील वाढल्याचे दिसून येत आहे. 9 तारखेला नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या विकास देवीचंद चव्हाण (वय 23 , रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) या तरूणाची कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.

सदर तरुणाचा हात कोपऱ्यापासून तोडण्यात आला होता. पोलिसांनी शाहरुख खान फिरोज खान (२८, रा. जुना बाजार) या आरोपीस ताब्यात घेतले. 

दिव्यांग असलेल्या विकासजवळील ५०० रुपये लुटण्याच्या इराद्याने त्याने परीक्षा केंद्रावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून कब्रस्तानात नेले. तेथे मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकासने विरोध करताच त्याने चाकू काढून सपासप वार करत खून करून त्याचा एक हात कापला अशी माहिती तपासाअंती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या