Ticker

6/Breaking/ticker-posts

Redmi Note 10 : स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच..! जाणून घ्या डिटेल्स.

 

 


    
       



 *Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच

*३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार

*33 वॉट फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरी

 लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

 

नवी दिल्लीः Redmi Note 10 सीरीजची उत्सूकता लवकरच संपणार आहे. कंपनी या सीरीजच्या स्मार्टफोनला ४ मार्च रोजी लाँच करणार आहे. रेडमी नोट १० सीरीज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अपकमिंग सीरीजच्या फीचर्स संबंधी अनेक माहिती समोर आली आहे. या यादीत आता रेडमी नोट १० संबंधी नवीन माहिती समोर आली आहे. यानुसार, फोनच्या ग्लोबल व्हेरियंट मध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसर ऑफर करणार आहे.

लीक्स्टरने शेयर केले फोटो
लीक्स्टर Xiaomi Leaks Ph ने या अपकमिंग सीरीजचा एक फोन रेडमी नोट १० चे रिटेल बॉक्सचा फोटो शेयर केला आहे. या बॉक्स सोबत फोनला पाहिले जाऊ शकते. फोनच्या डिस्प्ले वर प्रोटेक्टिव स्क्रीन दिले आहे. या प्रिंटेड प्रोटेक्टिव स्क्रीनमध्ये फोनचे खास वैशिष्ट्ये पाहिले जाऊ शकता येते. यानुसार, रेडमी नोट १० प्रोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसर दिला आहे. स्न्रॅपड्रॅगन ४जी प्रोसेसर दिला आहे. ज्यात क्वॉलकॉमने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये लाँच करण्यात आले होते. हे प्रोसेसर २०१९ च्या रेडमी नोट ७ प्रो मध्ये मिळणाऱ्या स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसरचे अपग्रेड व्हर्जन आहे.

48MP कॅमेरा आणि AMOLED डॉट डिस्प्ले
फोनमध्ये मिळणाऱ्या दुसऱ्या डिस्प्ले मध्ये ६.४३ इंचाचा अमोलेड डॉट डिस्प्ले मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. लीक्स्टर ने फोनचा जो फोटो शेयर केला आहे. त्यानुसार, रेडमी नोट १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय, फोनमध्ये एक अल्ट्रा वाइड अँगल आणि एक मायक्रो कॅमेरा मिळणार आहे.

33 वॉट फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरी
फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी मिळणार आहे. फोन ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येणार आहे. फोनमध्ये ओएस कोणता असणार आहे. यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. कंपनी यात अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्सवर बेस्ड MIUI 12 ऑफर करू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या