Ticker

6/Breaking/ticker-posts

क्षुल्लक कारण, नवऱ्याकडून चक्क लग्नाला नकार; गुन्हा दाखल

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पालघर : लग्न जमल्यानंतर कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू न वापरल्याचे कारण देत चक्क लग्न मोडल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी नवऱ्या मुलाचे आई-वडील आणि काकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नेमकं काय घडलं?

सुधाकर विठ्ठल पाटील हे भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असून ते सध्या वसईत मुक्कामी आहे. त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील खुपरी गावातील एका मुलीसोबत ठरले होते. ही मुलगी एका सुसंस्कृत कुटुंबातील असून ती उच्चशिक्षित आहे. हे लग्न जमविण्यासाठी त्या मुलाचे काका कमलाकर विठ्ठल पाटील यांनी पुढाकार घेतला होता. हे लग्न जमल्यानंतर 30 ते 40 नातेवाईकांच्या उपस्थितीत टिळा लावण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुलीकडील मंडळीने होणाऱ्या नवऱ्याकडील मंडळींचे अगदी थाटामाटात स्वागत केले. त्यांना साडीचा मानपान देण्यात आला. तसेच लाख रुपये खर्च करुन साग्रसंगीत जेवणाचेही आयोजन करण्यात आले.

नवरीच्या वडिलांकडून पोलिसात तक्रार

यानंतर दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी नवऱ्या मुलाने आणि त्याचा काकाने हे लग्न होणार नाही, असे सांगितले. तुमच्याकडे ब्रँडेड कुंकू वापरले नाही. मुलीची आई माझ्याशी बोलली नाही, हसली नाही. माझ्या आईने तिला शनिवारचे उपवास करायला सांगितले, पण मी अॅडजस्ट करेन असे सांगितले. त्यामुळे आम्हाला अॅडजस्ट करणारी मुलगी नको, असे कारण नवरा मुलाच्या नातेवाईकांकडून देण्यात आले. यानंतर नवरी मुलीच्या वडिलांनी वारंवार नवरा मुलगा आणि त्यांच्या काकांना फोन विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र काका कमलाकर पाटील याने फोन उचलला नाही. यानंतर अखेर नवरी मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली

नवरा मुलासह आई-वडिलांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या होणाऱ्या सासूला कुंकू आवडले नाही. म्हणून त्या मुलाने त्या मुलीला नकार दिला. त्याविरुद्ध लग्न मोडणाऱ्या नवरा मुलगा त्याचे आई वडील आणि त्याच्या काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 420, 417, 500, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या