Ticker

6/Breaking/ticker-posts

विश्वास नांगरे पाटील शरद पवारांना भेटले, काय झाली चर्चा ?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर यांची आत्महत्या प्रकरणं गाजत आहेत. विरोधकांनीही या दोन्ही प्रकरणावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. विशेष म्हणजे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी खा. शरद पवारांची नुकतीच  भेट घेतलीय. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय

 

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी विश्वास नांगरे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली असून, कायदा आणि सुव्यवस्थेची भेटीत चर्चा झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यात गाजत असलेल्या मनसुख, डेलकर आणि वाझे प्रकरणावर दोघांची चर्चा झाल्याचीही सूत्रांनी माहिती दिलीय. शरद पवारांच्या भेटीसाठी विश्वास नांगरे पाटील रात्री सव्वा आठ वाजता सिल्व्हर ओकवर आले होते. ते  8. 45 मिनिटांपर्यंत  म्हणजेच जवळपास अर्धा तास सिल्व्हर ओकवर होते. त्यामुळे दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालीय. मुकेश अंबानीच्या घराबाहेर जी स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यात आली होती, त्याच मुद्द्यावर ही भेट झाल्याची माहिती मिळतेय.

पवारांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची घेतली माहिती

महत्त्वाचे म्हणजे मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण आणि त्या प्रकरणाशी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांचा असलेला संबंध यावर चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालीय. तसेच शरद पवारांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचीही माहिती घेतली असावी, अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे आता शरद पवारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. पण शरद पवार रात्री उशिरा भेटणार की उद्या दिवसभरात मुख्यमंत्र्यांना भेटणार हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी विश्वास नांगरे पाटलांना बोलावून घेतलं आणि या दोन्ही प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली असावी, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या