Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत युवकांनी सक्रिय व्हावे - आ. डॉ. सुधीर तांबे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसची जिल्हा पातळीतालुका पातळी व ग्रामीण भागातील गाव पातळी पर्यंत त्रिस्तरीय संघटनात्मक बांधणी करण्याचा एक व्यापक कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला असून गावपातळीपर्यंत सक्षम काँग्रेस पक्षाचे संघटन निर्माण करण्यासाठी युवकांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असून युवक कार्यकर्त्यांनी या संघटनात्मक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.


अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी च्यावतीने आयोजित जिल्हा काँग्रेसच्या दक्षिण विभागातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्षांच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके उपस्थित होते.


 या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळकेजिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजरजिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारेशहर जिल्हाध्यक्ष किरण काळेमागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारेजिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भैय्या वाबळेकार्याध्यक्ष राहुल उगलेसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे सर तसेच दक्षिण विभागातील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्केबाळासाहेब आढावकिरण पाटीलसंभाजी रोहकलेनासीर शेखदीपक भोसलेशहाजीराजे भोसलेडॉ. अमोल फडकेमनोहर पोटेसचिन घुले आदी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना आमदार तांबे पुढे म्हणालेपुढील वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून नगरपंचायतनगरपालिका व जिल्हा परिषदांचे निवडणुकीसाठी तालुका पातळीवर तालुका काँग्रेस बरोबर काँग्रेस पक्षाच्या असणाऱ्या सर्व फ्रंटल संघटनांचे तालुका व्यापी संघटन निर्माण करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला असून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी या कामात सहभागी व्हावे.


जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके याप्रसंगी बोलताना म्हणाले कीजिल्ह्यात गाव पातळीपर्यंत काँग्रेसचे संघटन निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद गटाचे पातळीवर गट प्रमुख व पंचायत समिती गणाचे गण प्रमुख नेमण्यात येत असून प्रत्येक जिल्हा परिषद गटातील व गणातील प्रत्येक गावात शाखा निर्माण करण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून पुढील तीन महिन्यात प्रत्येक गटातील व गणातील गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या ग्राम शाखा निर्माण करण्यात येतील.


जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायतनगरपरिषद व नगर पालिकेच्या प्रत्येक वॉर्डांत काँग्रेसची शाखा निर्माण करण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष जबाबदारी घेणार असून या काळात शहरातील सर्व सामाजिक घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. याप्रसंगी किरण पाटीलबाळासाहेब आढावअमोल फडकेदिपक भोसलेनासीर शेख इ. अध्यक्षांनी अहवाल मांडला तर संपतराव म्हस्के यांनी आभार मानले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या