Ticker

6/Breaking/ticker-posts

पाक खेळाडूचा विक्रम धोक्यात ; रोहित व विराटला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड  यांच्यात १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या सर्व लढती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत १४ टी-२० लढती झाल्या आहे. यापैकी दोघांनी प्रत्येकी ७ मध्ये विजय मिळवला आहे.

टी-२० मालिकेत इंग्लंड चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-१ने पराभव केला होता. त्यामुळे आता टी-२० मध्ये विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याच बरोबर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेत काही महत्त्वाचे विक्रम होण्याची संधी आहे. ते असे..

विराट कोहली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत ८५ सामन्यात २ हजार ९२८ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला ३ हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ७२ धावांची गरज आहे. पाच सामन्यात त्याने या धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरले. या मालिकेत १७ धावा पूर्ण करता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा करणारा तो तिसरा कर्णधार होता. रिकी पॉन्टिंगने कर्णधार म्हणून सर्वाधिक १५ हजार ४४० तर ग्रॅमी स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा- इंग्लंडविरुद्ध भारताच्या उपकर्णधाराला विक्रमाची संधी आहे. या मालिकेत रोहितने १३ षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो. रोहितने १२७ षटकार मारले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने रोहितला मागे टाकत हा विक्रम स्वत:च्या नावावर केला होता. आता रोहितला पुन्हा हा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. गप्टिलने १३९ षटकार मारले आहेत. याच बरोबर ६७ धावा करताच रोहित गप्टिलला मागे टाकू शकतो. रोहितने टी-२० मध्ये आतापर्यंत २ हजार ७७३ धावा केल्या आहेत.

डेव्हिड मलान- इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी आहे. मलानने टी-२०च्या १९ डावात ८५५ धावा केल्या आहेत. जर भारताविरुद्धच्या पाच सामन्यात त्याने १४५ धावा केल्या तर तो १ हजार धावा पूर्ण करेल. यासह टी-२० मध्ये सर्वात वेगाने १ हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. हा विक्रम सध्या बाबरच्या नावावर आहे. त्याने २६ डावात ही कामगिरी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या