Ticker

6/Breaking/ticker-posts

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय दोन दिवसात- शरद पवार

 प्रकरणाची चौकशी ज्युलिओ रिेबेरोंसारख्या उत्तम अधिकाऱ्यांमार्फत व्हावी- शरद पवार








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्ली: राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असला तरी राजीनाम्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकले जाईल. त्यानंतर इतरही नेत्यांशी बोलून देशमुख यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे अनिल देशमुख हे गृहमंत्रीपदावर राहणार की त्यांना हटवले जाणार हे येत्या दोन दिवसात ठरण्याची शक्यता आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल यांच्यावर केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर असल्याचे पवार म्हणाले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी आज केली. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत  होते.

राजीनामा घ्यायचा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. यावर देखील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. म्हणून राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असे पवार यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या