Ticker

6/Breaking/ticker-posts

.. तर पेट्रोल होईल ७५ रूपये लीटर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : देशभरात फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ वेळा इंधन दरवाढ झाली. या दरवाढीने काही शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली तर डिझेल ९० रुपयांवर गेले आहे. यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. इंधन दरात राज्य आणि केंद्र सरकारच्या करांचा मोठा वाटा आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर कक्षेत आणले तर पेट्रोलचा भाव ७५ रुपये लीटर इतका खाली येईल, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

वस्तू आणि सेवा कर कक्षेत पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची मागणी जीएसटी लागू झाल्यापासून होत आहे. मात्र जीएसटी लागू होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचा करांचा बोजा असल्याने ग्राहकांना सध्या उच्चांकी किंमत मोजावी लागत आहे. केंद्र सरकरने राजकीय इच्छाशक्ती दाखवून पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केला तर पेट्रोल ७५ रुपये लीटर आणि डिझेल थेट ६८ रुपये लीटर इतके कमी दरात उपलब्ध होईल, असा दावा 'एसबीआय'च्या आर्थिक अहवालात करण्यात आला आहे.

जीएसटीच्या कक्षेमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश केल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुलात एक लाख कोटींची तूट होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी जागतिक बाजारात जेव्हा कच्च्या तेलाचा भाव ६० डॉलर खाली असेल आणि डॉलरच्या तुलनेत रुपया ७३ वर ग्राह्य धरण्यात आला आहे. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधन दर कमी करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय साधून निर्णय घ्यावा असे म्हटलं होते. इंधवरील मूल्यवर्धित कर आणि अधिभार यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला मोठा कर महसूल मिळतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत समावेश करण्यात केंद्र आणि राज्य सरकार विरोध करत आहेत, असे या अहवालात म्हटलं आहे.

इंधनावर राज्य सरकारकडून मूल्यवर्धित कर, अतिरिक्त सरचार्ज आकारतात. त्याशिवाय कच्च्या तेलाची किंमत, वाहतूक खर्च, डिलर कमिशन, उत्पादन शुल्क यासारख्या करांचा आणि उपकरांचा भार पेट्रोल आणि डिझेलवर लादला जातो. पेट्रोलसाठी ३.६७ रुपये आणि डिझेलसाठी २.५३ रुपये डिलर कमिशन आहे. पेट्रोलवर ३० रुपये आणि डिझेलवर २० रुपये अधिभार (सेस) आहे जो केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विभागला जातो.

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल - डिझेल दर स्थिर
पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज गुरुवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१९ रुपये आहे. त पेट्रोलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या