Ticker

6/Breaking/ticker-posts

देसवड्यात दुचाकीच्या व वीजपंप चोरणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांकडून बेदम चोप..!

 

३ चोरटे घटनास्थळावरून फरार, दुचाकी व शेती पंप चोरीचे मोठे रॅकेटची शक्यता

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पारनेर :-पारनेर तालुक्यातील देसवडे गावानजीक बुधवारी सायंकाळी गोविंद कानडे यांच्या मकाच्या शेतात चोरीची दुचाकी आणुन लपून बसलेल्या संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला असून त्याची इतर तीन साथीदार या घटनेनंतर फरार झाले आहे. या साथीदारांची ओळख देसवडे ग्रामस्थांसह पोलिसांना पटली आहे. त्यामुळे साह्यक फौजदार शिवाजी नानाभाऊ कडूस यांच्या फिर्यादीनुसार सध्या तरी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील एक चोर संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून या चोरीत सामिल‌ असलेले ३ जण पारनेर तालुक्यातील वारणवाडी गावातील पारदरा ( ठाकूरवाडी) येथील रहिवासी आहे. देसवडे‌ गावातील संगीता संजीव भोर व रामा गुंड या दोघांनी मोटारसायकल घेऊन पळून जाणाऱ्या चोराला मोठ्या शिताफीने पकडले असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 या दुचाकी व वीजपंप चोरीप्रकरणी पोपट नाथु भुतांबरे राहणार शिंदेवाडी तालुका संगमनेर या चोराला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी व्यक्त केली आहे.तर दुसरीकडे इतर ३ चोरांनाही तातडीने अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संजीव भोर यांनी दिला आहे.देसवडे व परिसरात दुचाकीसह शेतीपंपाची चोरी मोठ्या प्रमाणावर होत असून ही चोरी या चोरांनी केली असल्याची शक्यता सुद्धा भोर यांनी व्यक्त केले आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी जलदगतीने तपास करावा अशी मागणी सुद्धा संजीव भोर यांनी केले आहे.

यासंबंधची पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की देसवडे‌ गावातील संतोष कानडे, पंढरीनाथ भोर, गेनभाऊ कानडे, सुनिल गुंड असे एकञ जमल्यानंतर ती गाडी कोणाची आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण तेथेच थांबुन राहीलो. बुधवारी  सांयकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसम यांनी सदरची गाडी मक्याचे पिकातुन मुख्य रोडवर घेवुन येवुन गाडी चालु करत असताना आम्ही सर्वांनी त्यांना पकडले व त्यांना त्यांचे नावागावाची विचारणा केली असता पोपट नाथु भुतांबरे व पिंट दुधावडे असे सांगीतले. सदरचे गाडीबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी ही गाडी चोरीची असलेली सांगीतले व ती गाडी आम्ही विकणेसाठी येथे आलेला आहोत असे कळविले.

 सदरची गाडी ही चोरीची असलेचे आमचे लक्षात आलेने आम्ही पोलीसांना फोन करा असे म्हटले नंतर आमचे सोबत झटापटी केली व पिंटु दुधावडे यांने आमचे सोबत असलेले संगीता संजीव भोर यांचे पोटामध्ये बुक्की मारुन अंधाराचा फायदा घेवुन तो तेथुन पळुन गेला आहे.तसेच दिनांक  १७  मार्च रोजी सांयकाळी ८ वा चे सुमारास आम्ही मक्याचे शेतातील बजाज प्लटीना गाड़ी नं एमएच 17 ए एस 3743 ही गाडी घेवुन जात असताना पोपट नाथु भुतांबरे रा शिंदोडी ता संगमनेर व पिंटु दुधावडे यांना सदर गाडीची विचारपुस केली असता गाडी चोरीची असुन ती आम्ही येथे विकणेसाठी आलेलो आहोत असे सांगीतले नंतर आम्ही पोलीसांना फोन करा असे म्हटले नेतर आमचे सोबत झटापटी केली व पिंटु दुधावडे यांने आमचे सोबत असलेले संगीता संजीव भोर यांचे पोटामध्ये बुक्की मारुन अंधाराचा फायदा घेवुन तो तेथुन पळुन गेला म्हणुन आमची त्यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. माझी वरील संगणकावरील टंकलिखित केलेली फिर्याद ही मराठीत लिहलेली असुन तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे‌ समक्ष हे लिहुन दिले.तर दुसरीकडे या दोन चोरट्यांबरोबर पांग्या दुधवडे  व अशोक दुधवडे राहणार वारणवाडी पारदरा हे ही सामील असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या रॅकेटमध्ये हे दोघेही सामिलीची कबुली ‌पकडलेल्या चोरट्याने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या