Ticker

6/Breaking/ticker-posts

अग्रलेखाची ताकद एका व्यंगचित्रात, शिक्षकाने जोपासला अविरत छंद ..!

 वर्मावर बोट ठेवून समाज्यात  जाणीव जागृतीचे भान करून देणारा शिक्षकातील  व्यंगचित्रकार

वीस वर्षांत अडीच हजार रेखाटली व्यंगात्मक चित्रसृष्टी -



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार : -आपल्या पेन्सिलने समाज व्यवस्थेवर व्यंगचित्राच्या माध्यमातून  फटकारे मारणारी व्यंगचित्रकार नवीन युवा पिढी दुर्मिळ झाले आहेत . समाज जिवनात वावरत असतांनाच ब-याचदा चांगले -वांगले अनुभवास येते त्यावर बरे वाईट भाष्य प्रकट करण्याच्या पध्दतीत समावेश होतोय व्यंग चित्राची असीच बांधीलकी एक शिक्षक जोपासतोय आणि प्रचलीत घडामोडींवर रेखाटतोय व्यंगचित्र ,वीस वर्षांच्या कालावधीत किमान अडीच हजार व्यंग चित्रातुन  जाणीव जागृतीचे काम आतापर्यंत केले व ते सुरूच आहे .

मिडसागंवी ता . पाथर्डी येथिल जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत असणारे दिपक महाले  हे ज्ञानदान करत शैक्षणीक कामात कुठेही बाधा येऊ न देता व्यंगचित्र रेखाटण्याचा छंद ते जोपासतात , याबाबत ते म्हणाले शालेय जिवनातच चित्रकलेची आवड होती . त्यावेळी वृत्तपत्रातील व्यंगचित्रे पाहुन मलाही हे जमु शकेल असा विचार मनात आला अन् सुरू झाली कागद पेन्सिलत्यातुन एक एक चित्र जन्म घेत असतांनाच पहीले व्यंग चित्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच वृतपत्रात छापुन आले त्याचबरोबर पेन्सील कागदावर चालवण्यास गती देणारा छंद बळावत गेला.आजवर जवळपास अडीच हजार व्यंगचित्राने जन्म घेतला. ही चित्र ज्या त्या वेळी प्रसंगानुरूप असतात चित्रातुन व्यंगावर बोट ठेवले जाते ,ते हसत खेळत एक गंमत म्हणुन स्विकारले जातात चाणाक्ष त्यातील मर्म जाणतात देखील ,सामाजीक भान जागृतीचे काम होतेच पण कुणालाही यातुन दुखावले जात नाही. आता पर्यंत विविध दैनीक,दिपावली अंक,साप्ताहीकातुन व्यंगचित्र लोकांपर्यंत पोहोचली आणि ती स्विकारली गेली .

स्वच्छता ,पाणी टंचाई,शौचालय , मोबाईल गेम्स,रस्त्यावरील खड्डे,डासांचा उपद्रव ,वृक्ष लागवड, बेसुमार वृक्षतोड ,प्रदुशन ,व्यसन,  याबरोबरच "अर्कचित्रे" या सदराखाली अनेक मान्यवरांची  नाना प्रकारचे व्यंगचित्र तयार केले. या चित्रांना संमेलन स्थळी चांगली दाद मिळत गेली , आतापर्यंत मुंबई,नागपुर ,ठाणे ,नासिक,अमरावती ,पुणे या मोठ्या शहराशिवाय शब्दगंध ,एकता साहित्य संमेलन,सिंदफना साहित्य संमेलन,आण्णाभाउ साठे संमेलनात महाले यांचे व्यंगचित्राने जागा मिळवली   .

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामकरन केलेल्या व्यंगचित्रकाराच्या कार्टूनीस्टस कंबाईन संस्थेचे महाले  सदस्य आहे .

बॅकेने पावटक्का व्याज दर कमी केलाय ,वाचलेल्या पैशातुन हे पाव आणलेत ! ने ! ३१ डीसेंबरला दुधाची मागणी घटते !

टायर मधे हवा भरून मिळेल परंतू एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही !

 मी आता माॅडर्न झालो बॅकेचे व्यवहार  ऑनलाईन करतोय मला गंडा देखील ऑनलाईनच घातला जातोय !

येव्हडी महागाई होऊन देखील तु जिवंत कसा? काही दोन नबंर तर करत नाही ना?

 मोबाईल ची रेंज सारखी ये जा करते ,बहुदा मोबाईल टावर वीज कंपनीने चालवायला घेतले असावे !

सध्या लग्न वेळेवर लागतच नाही यावर भाष्य करतांना लग्न दुपारचं की संध्याकाळच?

 पाणीटंचाई बाबत व्यंगचित्रातुन सांगीतले जाते, दोनदा दोनदा काय जाता पाणी टंचाई माहीत नाही का?

असे नित्य नुतन बोलके व्यंग चित्र रेखाटून दिपक महाले समस्यांना प्रकाशीत करण्याचे काम करतात .तीक्ष्ण भाषेत  बोलणे ,टिकात्मक लिखाण , यापेक्षा हे माध्यम आपले लक्ष साध्य  करण्याचे चांगले माध्यम असुन व्यंगचित्रात जनमत बदलण्याची ताकद असते तर परिवर्तन घडवण्यासाठी चांगले माध्यम असल्याचे दिपक महाले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या