Ticker

6/Breaking/ticker-posts

फिनिक्स फाऊंडेशनचे सावित्रीबाई फुले स्मृतीगौरव पुरस्कार जाहीर

 


सुमन धामणे, माधुरीताई जाधव, इंजी. सायली पाटील, प्रा. सिमा गायकवाड, हिराताई बोरुडे, शारदा होशिंग, जागृती ओबेरॉय पुरस्काराच्या मानकरी

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी होणार पुरस्कार वितरण

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अहमदनगर : - फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा सावित्रीबाई फुले स्मृतीगौरव पुरस्कार 2021 युट्यूब स्टार सुमन धामणे, माधुरीताई जाधव, कार्यकारी अभियंता इंजी. सायली पाटील, प्रा. सिमा गायकवाड, हिराताई बोरुडे, सामाजिक कार्यकर्त्या शारदा होशिंग, जागृती ओबेरॉय यांना जाहीर झाला असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी नागरदेवळे येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनी सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना दिला जातो. ग्रामीण भागातील सुमन धामणे यांनी पाककलेत युट्यूबवर विविध व्हिडिओ बनवून त्या युट्यूबस्टार ठरल्या आहेत. 

माधुरीताई जाधव साईद्वारका व हेल्प मी इंडिया ट्रस्टच्या सल्लागार असून, या संस्थेच्या माध्यमातून त्या वंचित घटकांना मदत देण्याचे कार्य करीत आहे. कार्यकारी अभियंता इंजी. सायली पाटील यांनी कोरोना काळात देखील मुळा पाटबंधारे धरण विभागाचे उत्तमरित्या नियोजन करुन कार्य केले. प्रा. सिमा गायकवाड यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे.

 हिराताई बोरुडे यांनी उद्योजक मुले घडवून शहरात नामांकित हॉटेल उभे केले आहेत. शारदा होशिंग या स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असून, त्यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. जागृती ओबेरॉय यांनी सेवाप्रीत फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना आधार देण्याचे कार्य केले. तसेच वर्षभर त्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवित असतात. 

या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेऊन फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने त्यांना सावित्रीबाई फुले स्मृतीगौरव पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे. बुधवार दि.10 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता नागरदेवळे (ता. नगर) येथे होणार्‍या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पाळन करुन हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या