लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे झालेल्या बैठकीमध्ये गोंधळी समाज संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तुळजापूर येथील नेते राजेंद्र गायकवाड यांनी बाबासाहेब कदम यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे.
छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस गोंधळी समाजाने देखील संबळाचा निनाद करत गोंधळ परंपरेच्या माध्यमातून रयतेला जागृत करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने केले होते.मात्र समाज जागृती करणारा गोंधळी समाज बांधव आज ही उपेक्षितपणे जीवन जगत आहे.या समाजाच्या उत्कर्षासाठी शासन दरबारी लढा उभारून त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळेल असा प्रयत्न सर्व समाज बांधवांना एकत्रित करून आपण संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या