Ticker

6/Breaking/ticker-posts

अनागोंदी: सरकारी अहवाल निगेटीव्ह मात्र खासगी प्रयोगशाळेत 'तो' करोना पॉझिटिव्ह..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- करोना चाचणीचे खासगी व सरकारी प्रयोगशाळांतील अहवाला तफावत येत असल्याची चर्चा नेहमीच असते. सरकारीपेक्षा खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त कसे ? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. असाच एक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. एका व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेने करोनाबाधित ठरविले (Corona Positive). तर त्याच दिवशी त्याच व्यक्तीचा सरकारी रुग्णालयातील अहवाल मात्र निगेटीव आला. आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संघटनांकडून होत आहे.

दोन प्रकारच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या खासगी प्रयोग शाळेची नोंदणी रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांच्याकडे करण्यात आली.

कोठी येथील चंद्रकांत उजागरे यांनी अस्वस्थ वाटू लागल्याने सावेडी येथील एका खासगी लॅबमध्ये १८ मार्चला तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत अधिक खात्री करण्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्याच दिवशी तपासणी करुन घेतली. त्याचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. एकावेळी एकाच माणसाचे दोन वेगवेगळे अहवाल येत असल्याने कोणत्या अहवालावर विश्‍वास ठेवायचा हा प्रश्न पडला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. यावेळी विश्‍व मानवाधिकार परिषदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद शफीबाबा, जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, अल्ताफ शेख, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव शब्बीर शेख, सचिव मुजम्मिल पठाण, ललित कांबळे, शादाब कुरेशी, ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, वाहिद शेख उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या