Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची देशभर धुळवड ! नवीन रुग्णांची संख्या ६८ हजारांवर लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः देशात एकीकडे होळीच्या सणाचा आणि धुळवडीचा आनंद असताना दुसरीकडे मात्र करोनाने कहर केला आहे. आता देशात या वर्षातील आणि गेल्या ऑक्टोबरनंतर करोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे. देशात सोमवारी करोनाचे ६८ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सकाळी ही आकडेवारी जारी करण्यात आली. गेल्या २४ तासांत ६८,०२० इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान २९१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार देशात आतापर्यंत करोनाने एकूण १,६१,८४३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १,२०,३९,६४४ इतकी झाली आहे.

गेल्या २४ तासांत ३२,२३१ जण करोनामुक्त झाले आहेत. करोनाचे वाढते रूग्ण आणि त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांची तुलना केल्यास रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५,२१,८०८ झाली आहे. म्हणजेच देशात सध्या ५ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहे.

 ५ राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४०,४१४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकमध्ये ३०८२, पंजाबमध्ये २८७०, मध्य प्रदेशात २२७६ आणि गुजरातमध्ये २२७० करोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.
गेल्या २४ तासांत करोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये ६९, छत्तीसगड १५, कर्नाटक १२ आणि केरळमध्ये १२ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या