Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात तापमानाचा पारा वाढणार..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात प्रचंड गारठा पसरलेला होता. त्यातच अधूनमधून अवकाळी पाऊसही पडत होता. आता अवकाळी पावसाच्या थैमानानंतर महाराष्ट्रातील काही जिल्हे उन्हानं तापू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा बसलाय सुरुवात होणार आहे. राज्यात तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.

 

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना उन्हाच्या झळा

राज्यात 10 मार्चपासुन काही भागांत कमाल तापमान 37-39 डिग्री सेल्सियस इतके राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज उन्हाचा तडाखा बसलाय. अकोला 39 डिग्री सेल्सियस, यवतमाळ 39.4 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवलं गेलंय.


गेल्या काही दिवसांपासून हवामानात वेगवान बदल दिसून येत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 11  दरम्यान मार्चपासून उत्तर भारतात रिमझिम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत अनेक राज्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. येत्या दोन दिवसांत उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, लडाखसह देशांतील बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या