Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनं खरेदी ; आठ महिन्यात तब्बल १२ हजार रुपयांनी स्वस्त झालंय सोनं..!

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी सध्या सोन्याचा भाव १२ हजारांनी स्वस्त आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६३०० रुपये प्रती १० ग्रॅम अशा विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे संशोधन, त्यानंतर सुरु झालेली लसीकरण मोहीम, अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात केलेली कपात आणि भांडवली बाजारातील तेजी या घटकांमुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात सोन्याचा भाव ४४ हजार रुपयांच्या आसपास दरम्यान आहे.

आज सोमवारी धुलिवंदन निमित्त मल्टी कमॉडिटी बाजार बंद आहे.मल्टी कमॉडिटी बाजारात शुक्रवारी शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये किंचित सुधारणा झाली.एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४४६५० रुपयांवर स्थिरावला. त्यात ४५ रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी दिवसभरात सोन्याचा भाव ४४४४१ रुपये इतका खाली आला होता.  चांदी
चा भाव एक किलोसाठी ६४६८४ रुपयांवर बंद झाला. त्यात १८५ रुपयांची
घसरण झाली होती.

Good returns  या वेबसाईटनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४२९८० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४३९८० रुपये आहे. दिल्लीत आज सोमवारचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४०७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८०७० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२२४० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६०८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४२०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६९२० रुपये आहे. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७२६.४५ डॉलर आहे. चांदीचा भाव २५.२३ डॉलर प्रती औंस आहे.

चालू महिन्यात सोने १८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट महिन्यातील विक्रमी किमतीच्या तुलनेत सोने सध्या १२००० रुपयांनी स्वस्त आहे. २०२० मध्ये करोनाचा प्रकोप वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. सोन्याचा भाव २८ टक्क्यांनी वधारला होता. तर चांदीच्या किमतीत १० हजारांची घसरण झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या