Ticker

6/Breaking/ticker-posts

आज पैसे कमावण्याची मोठी संधी, या दोन कंपन्यांचा आयपीओ उघडणार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

मुंबई : सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ आज उघणार आहे आणि 19 मार्च रोजी बंद होईल. सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरपूर्वी (IPO) बँकेने गुंतवणूकदारांकडून 170 कोटींपेक्षा जास्त जमा केले आहेत. कंपनीच्या प्रारंभिक पब्लिक इश्यू (आयपीओ) समितीने 13 मोठ्या गुंतवणूकदारांना 305 रुपयांच्या किंमतीला 55,77,920 शेअर्स देण्याचा निर्णय घेतला. हे वाटप 170.12 कोटी रुपये आहे. या आयपीओसाठी अर्जाची किंमत प्रति शेअर 303-305 रुपये आहे.

 

या गेमिंग कंपनीचा नझारा टेक्नॉलॉजीज  583 कोटींचा आयपीओ आज उघडत आहे. आयपीओची किंमत बँड प्रति शेअर 1,100-11,01 रुपये निश्चित केली गेली आहे. आयपीओ 19 मार्च रोजी बंद होईल. या कंपनीत ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा मोठा वाटा आहे. 30  डिसेंबर  20 20 पर्यंत कंपनीत राकेश झुनझुनवालाचे 3,294,310 शेअर्स किंवा 11.51 टक्के हिस्सेदारी होती.

कंपनीच्या वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप, छोटा भीम आणि मोटू पाटलू मालिकेवरील खेळ खूप लोकप्रिय आहेत. नजाराच्या आयपीओ अंतर्गत 52,94,392 शेअर्स प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक विक्री करतील. कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये बक्कळ पैसा कमावण्याची आणखी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण आता आणखी एक आयपीओ उघडणार आहे. कोरोनाच्या भीषण काळानंतर आता मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशात कल्याण ज्वेलर्सही आपला आयपीओ घेऊन आला आहे. ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्स आज म्हणजेच 16 मार्च रोजी आपला आयपीओ आणत आहे, जो 18 मार्चला बंद होणार आहे. या आयपीओद्वारे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात.

1175 कोटी उभारण्याची योजना

कल्याण ज्वेलर्सने आयपीओसाठी किंमत बँड निश्चित केला आहे. कंपनीने त्याची किंमत प्रति शेअर 86-87 रुपये ठेवली आहे. कल्याण ज्वेलर्सचा हा आयपीओ आज उघडत आहे म्हणजेच 16 मार्चपासून ते 18 मार्चला बंद असेल. या आयपीओद्वारे सुमारे 1175 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. यापूर्वी कंपनीने या आयपीओद्वारे 1750 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली होती. पण सध्याची बाजारपेठेची परिस्थिती पाहता कंपनीने हे 1175 कोटी केले आहे.

कंपनीविषयी महत्त्वाची माहिती

कल्याण ज्वेलर्स ही कंपनी दागिन्यांच्या व्यवसायात आहे. कल्याण ज्वेलर्सचे देशातील 21 राज्यात 107 शोरूम आहेत. याशिवाय या कंपनीचे विदेशातही 30 शोरूम आहेत. आता कंपनी आयपीओद्वारे शेअर बाजाराची यादी करुन गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करून आपला व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे. तुम्हीदेखील कंपनीचा आयपीओ खरेदी केल्यास चांगले पैसे कमावू शकता.

कशी कराल गुंतवणूक ?

बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते बँक खात्यासारखेच आहे, फरक फक्त इतका आहे की बँक खात्यात पैसे व्यवहार केले जातात. तर डिमॅट खात्यात शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. ज्याप्रमाणे बँकांमध्ये पैसे सुरक्षित असतात तसेच डिमॅट खात्यातील शेअर्स सुरक्षित असतात. तुम्हालाही या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे डिमॅट खाते असलेच पाहिजे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या